Loading..
श्री गुरुदेवांनी

सत्संग मंडळांसाठी केलेले मार्गदर्शन

सत्संग हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. मुळात आपला धर्मसुद्धा वादविवादाचा नसून संवादाचा आहे. सत्संग कुठल्याही पंथाचा वा पंथीय विचारांचा नसून ईश्वराच्या अधिष्ठानाचा आहे. सत्संग म्हणजे गुरुसेवाच होय. हा सत्संग श्रीगुरूंच्याच प्रेरणेने सुरू झाला आहे आणि त्यांची प्रेरणा सतत पाठीशी राहावी यासाठी मी स्वतःच त्यांची प्रार्थना करतो की, 'देवा, आम्ही जे जे कार्य करू त्यासाठी आपला आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सामान्य भक्त आहोत. आमच्याकडून अनन्य भक्ती व्हावी, एवढी कृपा आमच्यावर सतत राहू दे आणि आमच्या सत्संगाला पाठिंबा असू दे.'- श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी
साधकांना एकत्र आणून सर्वांच्या सहकार्याने श्रीगुरूंची सेवा आणि कार्य अधिकाधिक व्हावे, भक्तांच्या अंतःकरणात श्रीगुरूंबद्दल अधिक प्रेमभावना जागृत व्हावी आणि त्याच बरोबर कर्तव्यबुद्धीही जागृत व्हावी यासाठी श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी सत्संग मंडळांची स्थापना केली.
सत्संग म्हणजे सुसंगती, सत्प्रवृत्ती असलेल्यांचा सहवास ! सत्प्रवृत्ती असणाऱ्यांमध्येही जे वरदपिंड घेऊन म्हणजे ईश्वरी इच्छेने जन्माला आलेले असतात ते श्रेष्ठ समजले जातात. अशांमध्येसुद्धा ज्यांना वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ईश्वरदर्शन झाले आहे आणि ज्यांना श्री शंकरापासून सुरू झालेल्या गुरुपरंपरेतील गुरूंचा अनुग्रह लाभलेला आहे असे गुरू आणखी श्रेष्ठ असतात. अशा गुरूंचा सहवास मिळणं दुर्लभ असतं. अशा सत्संगाने देह आणि मन शुद्ध होऊन मनुष्य पावित्र्याची आणि मांगल्याची उंची गाठू शकतो.
सत्संगाचा लाभ अनेक प्रकारे घडतो. कीर्तन, प्रवचन, कथा, भजन हे सत्संगच आहेत. तसेच भगवंतावर तयार केलेले अभंग, श्लोक, स्तोत्रे हेसुद्धा तेच कार्य करत असतात; पण याहीपेक्षा उत्तम सत्संग कोणता असेल तर आपल्या गुरूंचे वाक्य ऐकणं आणि त्याप्रमाणे आचरण करणे. सत्संग हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. सद्गुरूंच्या आज्ञांचे पालन करणे, त्यांची सेवा करणे, त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे चित्तशुद्धी होणे, चित्तात परमेश्वराविषयी प्रेमाची भावना निर्माण होऊन त्यानुसार प्रत्यक्ष आचरण करणे हाही सत्संगच होय.
श्री गुरुदेवांनी सांगितलेली

सत्संग स्थापनेची उद्दिष्टे

सत्संग म्हणजे सुसंगती, सत्प्रवृत्ती असलेल्यांचा सहवास.
आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत, मन अतिशय उल्हसित व्हावे, निर्मल व्हावे, आपल्या मनाला एक प्रकारचे चैतन्य मिळावे यासाठी आपण हा सत्संग घेतो.
जे शिष्य आपल्या गुरूंकडे पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतात त्यांना सत्संगाचा पूर्ण लाभ होतो. तेव्हा गुरूंकडे पाहून ते वागतात कसे, ते बोलतात कसे, त्यांची श्रद्धा कशी आहे, त्यांचा भाव कसा आहे, सेवा तत्परता कशी आहे या सर्वांकडे लक्ष ठेवून आपल्यात त्या पद्धतीने बदल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
सत्संग हा संस्कार आहे. संस्कार सतत टिकला तर तुमच्या जीवनाची उत्क्रांती, उत्कर्ष आणि उद्धार होण्याची शक्यता आहे.
सत्संगाचे नोव्हेंबर 2024 - मधील विविध कार्यक्रम

कार्यक्रम

सत्संग मंडळाचा कार्यक्रम हा परमार्थापासून ते सामाजिक कार्य करण्यापर्यंत असावा, फक्त जप, ध्यान, पूजा-आरती एवढेच असू नये. देवधर्माचे कार्य म्हणजे तुम्ही ध्यान करता, चिंतन करता, मनन करता हे अतिशय उत्तम आहे; पण त्याबरोबरच सत्संगातर्फे वेदवाणीचे कार्यक्रम करावेत, भजनाचे कार्यक्रम करावेत, सामाजिक कार्याला मदत करावी.

सत्संग मंडळ स्थापन करणाऱ्या

परम पूज्य श्री गुरुदेवांविषयी

परम पूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १८५५, ‘श्रीमुख’ नाम संवत्सर, (१६ फेब्रुवारी १९३४) या दिवशी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे या गावी झाला. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे श्री गुरुदेव हे त्यांच्या मातापित्यांचे म्हणजे श्री. कृष्णाजी क्षीरसागर आणि राधाबाई यांचे आठवे अपत्य ! श्री गुरुदेवांचे पितृछत्र खूप लहान वयात हरपले. त्यानंतर मुलांना घेऊन आईसाहेब राधाबाई अ’नगर मध्ये वास्तव्याला आल्या. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी श्री गुरुदेवांना साक्षात्कार झाला, सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली आणि वृत्ती एकदम वैराग्याकडे वळली. मागील अनेक जन्मात तपश्चर्या, ईश्वरसेवा, भक्ती झाल्याशिवाय इतक्या लहान वयात ईश्वरी अनुभूती येणे शक्य नाही. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी म्हणजे श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांना गाणगापूरला बोलावून घेतले. तिथे संगमावर श्री गुरुदेवांची त्यांच्या गुरूंबरोबर भेट झाली आणि ‘इथून पुढे तुला तपश्चर्या करायची आहे’, असे त्यांनी श्री गुरुदेवांना सांगितले. तपश्चर्या म्हणजे जे श्री गुरुदेवांना प्राप्त झाले त्याबद्दल मौन बाळगणे ! अशारीतीने साडेपाचशे वर्षांपूर्वी कर्दळीवनात गुप्त झालेल्या आणि दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेल्या प. पू. श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींनी शिवगुरू स्वरूपात प्रकट होऊन श्री गुरुदेवांना अनुगृहीत केले. एकदा गुरुआज्ञा झाल्यावर पुढील पंचवीस वर्षे श्री गुरुदेवांना परत श्रीगुरूंचे दर्शन झाले नाही. पंचवीस वर्षांच्या त्या तपश्चर्येच्या काळात श्री गुरुदेवांना अतिशय त्रास आणि हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. तपश्चर्येचा काळ जसा संपत आला तसतशी लोकांना श्री गुरुदेवांच्या विभूतीमत्वाची प्रचीती येऊ लागली. भक्तांची होत असलेली गर्दी पाहता मोठी जागा असणे गरजेचे होते. त्याप्रमाणे श्री गुरुदेवांनी सावेडी रस्त्यावरील जागा निश्चित केली आणि ‘श्री दत्तात्रेय निवास’ ही वास्तू बांधून १९७४ साली प. पू. श्री गुरुदेव त्या ठिकाणी वास्तव्याला आले. पंचवीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर श्री गुरुदेवांना पुन्हा त्यांच्या श्रीगुरूंचे दर्शन झाले आणि त्यांनी श्री गुरुदेवांना सांगितले, ‘मला तुझ्याकडून वेदकार्य करून घ्यायचे आहे आणि तू आता त्या कार्याला लाग.’ त्यानुसार कार्य सुरू झाले. त्यानंतरचे आपले सर्व जीवन श्री गुरुदेवांनी वेदकार्यासाठी समर्पित केले.

प. पू. सद्गुरूंच्या नीलकांतीचा विडिओ

श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

ऑगस्ट मधले होणारे कार्येक्रम

Congue eu consequat ac felis donec et odio pellentesque. Amet nulla facilisi morbi tempus iaculis urna id. Urna id volutpat lacus laoreet.
श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

ऑगस्ट मधले होणारे कार्येक्रम

Congue eu consequat ac felis donec et odio pellentesque. Amet nulla facilisi morbi tempus iaculis urna id. Urna id volutpat lacus laoreet.
Find Your Dream

Now Real Estate Made Simple

Diam volutpat commodo sed egestas egestas fringilla phasellus. Purus non enim praesent elementum facilisis.Neque sodales ut etiam sit amet nisl.
Sit amet nulla facilisi morbi tempus. Egestas pretium aenean morbi tempus.
Montes nascetur ridiculus mus mauris vitae ultricies leo nibh nascetur.
Eleifend donec pretium vulputate sapien nec sagittis amet pretium.
Dignissim sodales ut eu sem integer vitae justo. Ut sem integer.
Vivamus at augue eget arcu dictum. Non quam lacus augue eget.
Consectetur adipiscing elit pellentesque habitant morbi pellentesque.
Id diam vel quam elementum. Venenatis lectus magna elementum.
Nunc eget lorem dolor sed viverra ipsum. In arcu cursus lorem dolor.
Testimonials

The Words of Clients

Aliquet enim tortor at auctor urna nunc id cursus. Mattis molestie a iaculis at erat pellentesque adipiscing commodo elit.
श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

सत्संगातील विविध समिती

सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी
श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

संपर्क

मासिक सत्संग सभेचा पत्ता
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी- संध्याकाळी 5 ते 7
आनंदाश्रम , ६६७ -६५२ , बाजीराव रोड , नारायण पेठ , पुणे - ४११००२