१. शाळांमध्ये सद्गुरूंची शिकवण प्रसारित करणे.
२. रामरक्षा, भीमरूपी, विष्णुसहस्रनाम, मनाचे श्लोक, आरत्या शिकवणे.
३. धार्मिक आणि पौराणिक गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणे.
४. धर्माचे उत्तम विचार मुलांमध्ये रुजवणे.
५. मुलांना सत्संगाशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
६. गुरुवाणी ग्रंथांचा अभ्यास करणे.
१. कोणत्याही सेवेसाठी प्रत्यक्ष सभासदांना, भक्तांना संपर्क करून सेवेला येणाऱ्यांची यादी निश्चित करणे.
२. ती माहिती यजमानांना/वैदिक समितीस/प्रसार समितीस कळवणे.
३. सेवांमध्ये वाहन व्यवस्थेचे नियोजन असेल तर त्यासाठी संपर्क करून भक्तांना कळवणे.
४. प्रसार सेवेच्या वेळी इच्छूक व्यक्तींचे संपर्क नंबर घेऊन त्याची नोंदवहीत नोंद करणे आणि नंतर त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी सत्संगात, देवस्थानात यावे यासाठी प्रयत्नशील राहणे.
५. नवीन आलेल्या भक्तांच्या संपर्कात राहून त्यांना ग्रंथांची माहिती देणे, तसेच नवीन भक्तांना काही गरज लागल्यास मदत करणे, उदाहरणार्थ सत्संगात किंवा देवस्थानात येण्यासाठी वगैरे.
१. पावती पुस्तकांचे दस्तऐवज ठेवणे, पावतीच्या क्रमांकांची संगणकामध्ये नोंद करणे. दर शनिवारी ऑफिसमधील प्रत्यक्ष पावती पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.
२. बाह्य ऑडिटर बरोबर संपर्कात राहणे आणि ऑडिट वेळेत पूर्ण करणे. अंतर्गत ऑडिटर बरोबर संपर्कात राहणे आणि ऑडिट वेळेत पूर्ण करणे.
३. पावती प्रमाणे जमा झालेले पैसे बँक खात्यामध्ये जमा करणे.
४. प्रत्येक सेवेच्या वेळेला पावती पुस्तक उपलब्ध करून देणे आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांकडून परत घेणे.
५. प्रत्येक पदाधिकारी सदस्यांच्या महिन्यातील मीटिंगच्या आधी जमाखर्चाचे रेकॉर्ड उपलब्ध करून देणे, आणि मीटिंग नंतर मिनिटबुक मध्ये त्या संदर्भात नोंद करणे.
६. पेटी कॅश दर महिन्याला सांभाळणे आणि त्याची नोंद ठेवणे.
७. आयकर आणि संबंधित व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रांची वेळेत तयारी ठेवणे.
८. लीगल समितीला लागणारी कागदपत्र पुरवणे.
१. नवनवीन सभासदांना प्रसार सेवा आयोजित करण्यासाठी उद्युक्त करणे.
२. पुण्याबाहेरील विविध प्रसार सेवांचे व्यवस्थापन करणे.
३. पुण्यामधील सर्व तालुक्यांमध्ये प्रसार सेवेसाठी प्रयत्न करणे.
४. प्रसार सेवेसाठी ठिकाणाची निश्चिती, सेवेला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, स्वयंपाक, आचारी आणि सभासदांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.
१. सत्संगासाठी वेबसाईट तयार करणे.
२. सत्संगासाठी ॲप तयार करणे.
३. सत्संगासाठी लागणारे कोणतेही सॉफ्टवेअर तयार करणे.
४. वेदकार्य आणि प्रसारसेवा यासाठी लागणारे प्रेझेंटेशन अथवा इतर आवश्यक बाबी तयार करणे.
१. धर्मादाय आयुक्तांना लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे.
२. याविषयी सभासदांना सांगणे, पत्रव्यवहार करून त्याचा मागोवा घेणे.
३. चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तालयात जमा करणे
४. सत्संगासाठी नवीन वास्तू ऑफिस म्हणून घेण्या विषयी रिपोर्ट जमा करून परवानगी घेणे.
५. वास्तूच्या व्यवहारासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे