Loading..

विविध कार्य समिती

विविध कार्य समिती

वैदिक समिती
१. मासिक वैदिक कार्यक्रमाचे नियोजन करणे, उदाहरणार्थ लघुरुद्र, महारुद्र, पवमान, नवचंडी, पर्जन्ययाग, विष्णु-लक्ष्मीयाग, दत्तयाग, सुदर्शनयाग, सौरयाग, श्रीसूक्त आवर्तने, अथर्वशीर्ष आवर्तने इत्यादी.
२. वैदिक कार्यक्रम करण्यासाठी जागा बघून तेथील परवानगी घेणे.
३. कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करणे.
४. कार्यक्रमासाठी गुरुजी ठरवणे आणि त्यांच्या संपर्कात राहणे.
५. सत्संग संस्थेच्या मालकीचे साहित्य लागल्यास कार्यक्रमासाठी ऑफिसमधून ते घेऊन जाणे व परत आणून ठेवणे.
६. वैदिकांचा यथाशक्ती सत्कार करणे.
प्रसार समिती
१. नवनवीन सभासदांना प्रसार सेवा आयोजित करण्यासाठी उद्युक्त करणे.
२. पुण्याबाहेरील विविध प्रसार सेवांचे व्यवस्थापन करणे.
३. पुण्यामधील सर्व तालुक्यांमध्ये प्रसार सेवेसाठी प्रयत्न करणे.
४. प्रसार सेवेसाठी ठिकाणाची निश्चिती, सेवेला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, स्वयंपाक, आचारी आणि सभासदांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे
वेद प्रसार समिती
१. विविध वेदपाठशाळांशी संपर्क करून वैदिकांची माहिती गोळा करणे.
२. विविध भागांमध्ये वैदिकांची माहिती घेऊन त्यांचे गट बनवणे, त्यांच्याशी संपर्क ठेवणे.
३. बाहेरगावी वैदिक कार्यक्रमांचे नियोजन करणे.
४. विविध गावात पर्जन्ययाग, लघुरुद्र अशा सेवा त्या लोकांमार्फत करवून घेणे.
५. ‘गाव तेथे वेदपाठशाळा’, ‘गाव तेथे पर्जन्ययाग’ अशा विविध योजना राबवणे.
६. शहरातील प्रत्येक सोसायटीमध्ये एखादा तरी रघुरुद्र घडावा यासाठी प्रयत्नशील राहणे.
७. वैदिकांना आर्थिक सक्षमता मिळवून देण्यास प्रयत्न करणे.
८. वेदमंत्रांवर शास्त्रीय संशोधन करणे, तसेच विविध वेदमंत्रांचा उपयोग कशासाठी होतो याचा अभ्यासून संकलन करणे.
९. वेदांचे फायदे/उपयोग या विषयावर विविध सोसायट्यांमध्ये आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये प्रेझेंटेशन देणे.
सर्व्हे समिती
१. सर्व प्रसार सेवांसाठी योग्य वेळात जागांचा सर्व्हे करणे.
२. सर्व्हेसाठी नवीन तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सेवेत सहभागी करून घेणे.
३. पुणे आणि आजूबाजूच्या २५ किलोमीटर परिसरामध्ये सेवांचे आयोजन करणे.
४. प्रसार सेवेसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सत्संगाच्या ऑफिस मधील वस्तू या ठरलेल्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणे आणि परत आणणे.
५. प्रसार सेवेसाठी लागणाऱ्या वाहन व्यवस्थेचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.
सत्संग समिती
१. मासिक सत्संग बैठकांचे नियोजन व व्यवस्थापन करणे.
२. सत्संग संस्थेच्या मालकीचे साहित्य सत्संगासाठी ऑफिसमधून घेऊन येणे व परत नेऊन ठेवणे. तसेच त्या साहित्याचा ताळेबंद ठेवणे आणि त्याची नोंद नोंदवहीत ठेवणे.
३. सत्संगातील मौल्यवान वस्तूंचे मूल्यांकन करवून घेणे.
४. सत्संगाच्या मासिक बैठकीच्या यजमानांना बैठकीत लागणाऱ्या गोष्टींची/वस्तूंची यादी पुरवणे.
५. वेद सेवेला, प्रसार सेवेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पुरवणे, उदाहरणार्थ पाण्याचे पिंप, सतरंज्या वगैरे.
६. सत्संग बैठकीसाठी माईक व्यवस्था बघणे, उपकरणे तसेच सतरंज्या, सत्संग हॉलची स्वच्छता ठेवणे. तसेच भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय ठेवणे.
७. सत्संग बैठकीचे सुशोभीकरण आणि हार, फुले, प्रसाद व्यवस्था, दर्शन रांगेचे नियोजन करणे.
अध्यात्म केंद्र समिती
१. सत्संगाचे आध्यात्मिक केंद्र होण्यासाठी प्रयत्न करणे.
२. जुन्या भक्तांना भेटून सद्गुरूंचे मार्गदर्शन समजावून घेणे, त्याचे रेकॉर्डिंग करणे आणि त्याचा प्रसार सेवेत उपयोग करणे.
३. सत्संगासाठी विविध ग्रंथ उपलब्ध करून देणे.
४. आध्यात्मिक ग्रंथांचा तसेच सद्गुरूंच्याच्या मार्गदर्शनाचा अभ्यास करून त्यावर बोलण्यासाठी भक्तांना प्रोत्साहित करणे.
५. शास्त्राच्या शंकांचे निरसन करण्यास मदत करणे.
६. सभासदांसाठी गीता व विष्णुसहस्त्रनाम शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.

विविध कार्य समिती

बालसंस्कार समिती
१. शाळांमध्ये सद्गुरूंची शिकवण प्रसारित करणे.
२. रामरक्षा, भीमरूपी, विष्णुसहस्रनाम, मनाचे श्लोक, आरत्या शिकवणे.
३. धार्मिक आणि पौराणिक गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणे.
४. धर्माचे उत्तम विचार मुलांमध्ये रुजवणे.
५. मुलांना सत्संगाशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
६. गुरुवाणी ग्रंथांचा अभ्यास करणे.
संपर्क समिती
१. कोणत्याही सेवेसाठी प्रत्यक्ष सभासदांना, भक्तांना संपर्क करून सेवेला येणाऱ्यांची यादी निश्चित करणे.
२. ती माहिती यजमानांना/वैदिक समितीस/प्रसार समितीस कळवणे.
३. सेवांमध्ये वाहन व्यवस्थेचे नियोजन असेल तर त्यासाठी संपर्क करून भक्तांना कळवणे.
४. प्रसार सेवेच्या वेळी इच्छूक व्यक्तींचे संपर्क नंबर घेऊन त्याची नोंदवहीत नोंद करणे आणि नंतर त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी सत्संगात, देवस्थानात यावे यासाठी प्रयत्नशील राहणे.
५. नवीन आलेल्या भक्तांच्या संपर्कात राहून त्यांना ग्रंथांची माहिती देणे, तसेच नवीन भक्तांना काही गरज लागल्यास मदत करणे, उदाहरणार्थ सत्संगात किंवा देवस्थानात येण्यासाठी वगैरे.
ऑफिस/कार्यालय समिती
१. पावती पुस्तकांचे दस्तऐवज ठेवणे, पावतीच्या क्रमांकांची संगणकामध्ये नोंद करणे. दर शनिवारी ऑफिसमधील प्रत्यक्ष पावती पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.
२. बाह्य ऑडिटर बरोबर संपर्कात राहणे आणि ऑडिट वेळेत पूर्ण करणे. अंतर्गत ऑडिटर बरोबर संपर्कात राहणे आणि ऑडिट वेळेत पूर्ण करणे.
३. पावती प्रमाणे जमा झालेले पैसे बँक खात्यामध्ये जमा करणे.
४. प्रत्येक सेवेच्या वेळेला पावती पुस्तक उपलब्ध करून देणे आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांकडून परत घेणे.
५. प्रत्येक पदाधिकारी सदस्यांच्या महिन्यातील मीटिंगच्या आधी जमाखर्चाचे रेकॉर्ड उपलब्ध करून देणे, आणि मीटिंग नंतर मिनिटबुक मध्ये त्या संदर्भात नोंद करणे.
६. पेटी कॅश दर महिन्याला सांभाळणे आणि त्याची नोंद ठेवणे.
७. आयकर आणि संबंधित व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रांची वेळेत तयारी ठेवणे.
८. लीगल समितीला लागणारी कागदपत्र पुरवणे.
सत्संग प्रसार समिती
१. नवनवीन सभासदांना प्रसार सेवा आयोजित करण्यासाठी उद्युक्त करणे.
२. पुण्याबाहेरील विविध प्रसार सेवांचे व्यवस्थापन करणे.
३. पुण्यामधील सर्व तालुक्यांमध्ये प्रसार सेवेसाठी प्रयत्न करणे.
४. प्रसार सेवेसाठी ठिकाणाची निश्चिती, सेवेला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, स्वयंपाक, आचारी आणि सभासदांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.
आयटी/सॉफ्टवेअर समिती
१. सत्संगासाठी वेबसाईट तयार करणे.
२. सत्संगासाठी ॲप तयार करणे.
३. सत्संगासाठी लागणारे कोणतेही सॉफ्टवेअर तयार करणे.
४. वेदकार्य आणि प्रसारसेवा यासाठी लागणारे प्रेझेंटेशन अथवा इतर आवश्यक बाबी तयार करणे.
लीगल/कायदेशीर समिती
१. धर्मादाय आयुक्तांना लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे.
२. याविषयी सभासदांना सांगणे, पत्रव्यवहार करून त्याचा मागोवा घेणे.
३. चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तालयात जमा करणे
४. सत्संगासाठी नवीन वास्तू ऑफिस म्हणून घेण्या विषयी रिपोर्ट जमा करून परवानगी घेणे.
५. वास्तूच्या व्यवहारासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे
Testimonial

Comments From Customers Regarding Our Services

सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी