Loading..

कार्य उद्दिष्ट

श्री गुरुदेवांनी

सत्संग स्थापनेच्या उद्देशांबद्दल केलेले मार्गदर्शन

श्रद्धा

जे शिष्य आपल्या गुरूंकडे पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतात त्यांना सत्संगाचा पूर्ण लाभ होतो. तेव्हा गुरूंकडे पाहून ते वागतात कसे, ते बोलतात कसे, त्यांची श्रद्धा कशी आहे, त्यांचा भाव कसा आहे, सेवा तत्परता कशी आहे या सर्वांकडे लक्ष ठेवून आपल्यात त्या पद्धतीने बदल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
Laundry facilities
Rooftop deck
Family rooms
Charging stations

श्रद्धा

जे शिष्य आपल्या गुरूंकडे पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतात त्यांना सत्संगाचा पूर्ण लाभ होतो. तेव्हा गुरूंकडे पाहून ते वागतात कसे, ते बोलतात कसे, त्यांची श्रद्धा कशी आहे, त्यांचा भाव कसा आहे, सेवा तत्परता कशी आहे या सर्वांकडे लक्ष ठेवून आपल्यात त्या पद्धतीने बदल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.

उद्धार

‘सत्संग हा संस्कार आहे. संस्कार सतत टिकला तर तुमच्या जीवनाची उत्क्रांती, उत्कर्ष आणि उद्धार होण्याची शक्यता आहे. जे शिष्य आपल्या गुरूंकडे पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतात त्यांना सत्संगाचा पूर्ण लाभ होतो. तेव्हा गुरूंकडे पाहून ते वागतात कसे, ते बोलतात कसे, त्यांची श्रद्धा कशी आहे, त्यांचा भाव कसा आहे, सेवा तत्परता कशी आहे या सर्वांकडे लक्ष ठेवून आपल्यात त्या पद्धतीने बदल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. ‘

अहंकार

सत्संगाने काय होतं तर आपल्या ठिकाणी असलेले दोष जातात. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे अशी आपण भावना केली म्हणजे आपला अहंकार नाहीसा होतो. हे एका ठिकाणी बसून घडत नाही तर चार माणसे एकत्र आली, चार भक्त एकत्र आले, की कोणाचे विचार कशा पद्धतीचे आहेत, कुणाचे भाव कसे आहेत ते पाहायला मिळतं. या करता सत्संग मंडळांची स्थापना आहे.

जाणीव

तुम्ही एकत्र येत आहात, देवाची प्रार्थना करत आहात, देवाची सेवा करत आहात, याचा परिणाम आपोआप लोकांवर होतो. तुमच्या वर्तनाने आणि तुमच्या वागण्याने लोकांवर चांगला परिणाम झाला पाहिजे. आपल्या वागण्यावरून आपले गुरू किती महान असतील याची जाणीव इतरांना झाली पाहिजे

आनंद

या सत्संगाला येण्यामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद हा पुरून उरला पाहिजे. याचा अर्थ असा, की सत्संगाला आल्यानंतर मनातली दु:खे नाहीशी होऊन मनाच्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला पाहिजे..

योजना

हा सत्संग स्वतंत्र नसून गुरुस्थानाचा सत्संग आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. सत्संगाचा लाभ सामान्य माणसांपर्यंत सर्वांना मिळावा, गुरूंचे शब्द प्रत्येकाला ऐकायला मिळावेत, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत तसेच त्यांच्या काय काय आज्ञा आहेत त्या समजावून घेण्यासाठी सत्संग मंडळांची योजना आहे.

परमार्थ

पूर्वीच्या काळामध्ये जो तो आपल्या स्वतःच्या हिमतीने परमार्थ करत होता; पण सध्याचा एकंदर बाहेरचा व्यापार किंवा इतर विचार केला असता प्रत्येकाला या गोष्टी साध्य होतात असे नाही आणि म्हणून अतिशय दूरदृष्टी ठेवून एकत्रितपणे परमार्थ साधण्यासाठी सत्संग स्थापन केलेला आहे

प्रेरणा

सत्संगाचे सर्व भक्त एकत्र आल्यानंतर ज्यांच्या प्रेरणेने म्हणा, इच्छेने म्हणा हा सत्संग सुरू झाला त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येक सत्संग मंडळाने केला पाहिजे
आपल्या देवस्थानातर्फे होणाऱ्या कार्यांमध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
गावोगावी सत्संग मंडळांची स्थापना तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्यासाठी केलेली आहे
सत्संगामध्ये येणारा प्रत्येक साधक हा कार्यकर्ताच असणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. मला आज जपजाप्य करणारा भक्तवर्ग नको, तसेच हे भजनी मंडळ होता कामा नये.

‘ सत्संग सद्गुरू संगतीचा ’

सत्संग हे निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. कोणी कीर्तनाला जातो, कोणी प्रवचनाला जातो, कोणी व्याख्यानाला जातो, कोणी भजनाला जातो. हे सुद्धा सत्संगाचे प्रकार आहेत; पण तुम्हाला लाभलेला सत्संग ‘सद्गुरू संगतीचा’ सत्संग आहे.
प्रसार सेवा
अधिक माहिती साठी
सत्संग म्हणजे सुसंगती, सत्प्रवृत्ती असलेल्यांचा सहवास.
आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत, मन अतिशय उल्हसित व्हावे, निर्मल व्हावे, आपल्या मनाला एक प्रकारचे चैतन्य मिळावे यासाठी आपण हा सत्संग घेतो.
आजच्या या सत्संग मंडळाचे पुढील काळात आध्यात्मिक केंद्र बनणे आवश्यक आहे. सत्संगाची बैठक ही अध्यात्माची बैठक असून या अध्यात्म बैठकीला आपले गुरू प्रत्यक्ष हजर आहेत.
मी जरी हा सत्संग स्थापन केलेला असला तरी ती एक संस्था आहे. संस्था स्थापन करणे हा गुण परमेश्वराने दिल्याशिवाय ते शक्य होत नाही. तुम्हाला धर्म समजावा, व्यवहार समजावा, आपल्या गुरूंची सेवा करता यावी म्हणून संस्था स्थापन केली आहे.
सत्संगाचे परिणाम हळूहळू होतात हे जरी खरं असलं तरी कर्तव्यबुद्धीने सत्संगाला हजर राहावे, हे अधिक उपकारक असतं. तुमचे गुरू देहरूपाने जरी तेथे नसले तरी आशीर्वाद रूपाने खासच तिथे आहेत अशी भावना ठेवा.
सत्संगाचे सर्व भक्त एकत्र आल्यानंतर ज्यांच्या प्रेरणेने म्हणा, इच्छेने म्हणा हा सत्संग सुरू झाला त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येक सत्संग मंडळाने केला पाहिजे.
सत्संगातूनच आपल्याला कार्य करण्याची स्फूर्ती मिळणार आहे. आपण कार्य करण्यास तत्पर असू तरच हे अनुभवास येईल.
सत्संग हा संस्कार आहे. संस्कार सतत टिकला तर तुमच्या जीवनाची उत्क्रांती, उत्कर्ष आणि उद्धार होण्याची शक्यता आहे.
सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी